img
Happiness
Madni Charitable Trust

Our Work

img
जीवनावश्यक वस्तुंच्या कीट्सचे वाटप

साधारणपणे गेल्या दिड महिन्यापासून जमियात उलमा व मदनी चॅरीटेबल ट्रस्ट सांगली तर्फे लॉकडाउन मुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी गोरगरीब व गरजवंतांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत या अनुषंगाने जिल्ह्यातील ३२०० गरजु कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंच्या किट्सचे वाटप सुद्धा पुर्ण केले आहेच शिवाय लॉकडाउनमुळे सांगली जिल्ह्यात अडकलेल्या बऱ्याच परप्रांतीय मजुरांची दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा ट्रस्ट मार्फत बरेच दिवसापासून चालु आहे. परवा, वाखारभाग सांगली येथील राजमाने चाळ मधील गरीब वारांगना (सेक्स वर्कर्स) महिलांना मदतीची गरज आहे असे समजताच ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी तेथे जाउन जीवनावश्यक वस्तुंच्या कीट्सचे वाटप केले. अशाप्रकारे ट्रस्टने सुनियोजित पद्धतीने लहान लहान टीम्स बनवुन फिजीकल डिस्टंन्सींग, स्वच्छता आणि हायजीन यांकडे पुर्ण लक्ष देउन व नियमांचे काटेकोरपणे पालन करत गरजु पर्यंत मदतीचा ओघ सुरु ठेवला आहे. हे सामाजिक कार्य करत असताना सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील रेड अलर्ट झोनमधील वारांगना (सेक्स वर्कर्स) आणि परप्रांतीय मजुरांचे सर्वाधिक हाल व उपासमार होत असल्याचे जाणवले. समाजातील या उपेक्षित घटकाची योग्य ती व्यवस्था केली जाउन त्यांना शासनातर्फे मदत आणि जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात यावा म्हणून मदनीचॅरिटेबलट्रस्ट सांगली तर्फे ट्रस्टचे अध्यक्ष हाफीज सद्दाम सय्यद महासचिव सुफीयान पठाण जमियतचे सेक्रेटरी मुन्नाभाई पट्टेकरी तसेच कायदा सल्लागार अॅड असिफ आत्तार यांच्या मार्फत सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी आणि सांगली जिल्हा पुरवठा आधिकारी बर्वे मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

img
मोफत कोविड सेंटरला सुपूर्द केली मोफत औषधे

एक दिलासा देणारा उपक्रम म्हणजेच मोफत कोविड़ हॉस्पिटल , हो! तुम्हे एकत आहत हे एकदम खरे आहे आजच्या परिस्तिथि पाहता संपूर्ण जगत कोरोनाची दूसरी लाट ची हे जागतिक आजार पूर्ण मानव जातीला ग्रासलेले आहे व सर्व जनता हे स्वत व स्वतःचे कुटुंबचेकाळजी करत आहे ते स्वाभाविक आहे परंतु अश्या काळात मानव जाती वर संकट आले आहे या जगामधे माणुसकी जपन्यासाठी आपल्या सांगली शहर मधे मोफत कोविड़ हॉस्पिटल उभरण्यात आले आहे. नगरसेवक मा अभीजित भोसले व त्यांचे सहकारी यांच्या सहयोग आहे अश्या वेळी मानवता हाच धर्म या नात्याने जमियत उलेमा हिंद(मेहमूद मदनी) व मदनी चैरिटेबल ट्रस्ट सांगली यांचे डेलिगेशन टीम ने मोफ़त कोविड़ हॉस्पिटल ला भेट देवून सपुर्ण पाहणी करुण व माहिती घेवून मोफत कोविड़ हॉस्पिटला लागणारे ओषधे संटीज़र मास्क व इतर साहित्य देण्याचे ठरविले त्या प्रमाणे आज रोजी प्रत्यक्ष मोफ़त कोविड़ हॉस्पिटला भेट देवून अभिजीत भोसले व टीम त्यांना प्रदान करण्यात आली ह्यावेळी जमियतचे जिल्हाध्यक्ष मुफ़्ती सादिक़ पटेल, कार्यध्यक्ष हाफ़िज सद्दाम सय्यद, मदनीचे महासचिव सुफ़ियान पठान , जमियत शहर अध्यक्ष मुफ़्ती इमरान ख़तीब, मौलाना कलीमुल्लाह बुधगॉव, एडवोकेट आसिफ़ अत्तार, तौसीफ़ कडलास्कर, इमरान बेग, व इतर मान्यवर उपस्थित होते.

img
पोस्ट कार्ड मोहीम

उठा जागे व्हा! संघर्ष करा! मुस्लिमांना आरक्षण मिळालेच पाहिजे. भारत देशातील मुस्लिमांची परिस्थिती दलितांपेक्षाहीअत्यंत वाईटआहे. हे न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर समितीने केंद्रसरकारला दिलेल्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल सरकारच्या दरबारी धूळखात पडून आहे.या अहवालातील शिफारशी नुसार मुस्लिमांना 5% पाच टक्के आरक्षण द्यावे. ही प्रमुख मागणी आहे. कर्नाटक, तामिळनाडू येथे मुस्लिमांना आरक्षण मिळाले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील मुस्लिमांना आरक्षण मिळावे यासाठी जागृत होऊन संघर्ष करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री आमदार गप्प आहेत. आपण सर्वांनी जागृत होऊन लढा उभारायला हवा आतापर्यंत फक्त आश्वासने मिळाली. पण त्याची पूर्तता होत नाही. म्हणून संघटित होऊ या. मुस्लिमांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी लढा उभारूया! त्यासाठी प्रथम राज्यकर्त्यांना पोस्टकार्ड पाठवून त्याची जाणीव करून देऊया म्हणून सर्वांनी आपल्या हस्ताक्षरात आरक्षण मागणी करणारे पोस्ट कार्ड पाठवून देण्याचे काम करावे ही विनंती.

img
कोरोनाशी लढा - एक हात मदतीचा

गेली दाेन दिवस देश लाॅकडाऊन असल्याने सर्वत्र हाॅटेल्स,खाद्यपदार्थ विक्रेते पूर्णपणे बंद असल्याने सांगली सिव्हिल हाॅस्पिटल मध्ये रुग्ण आणि नातेवाईकांना अक्षरशः उपाशी राहण्याची वेळ आली आहे. गेली 4 दिवस देश लाॅकडाऊन असल्याने सर्वत्र हाॅटेल्स,खाद्यपदार्थ विक्रेते पूर्णपणे बंद असल्याने,सांगली सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये रुग्ण असतात,त्याना जेवणाची व्यवस्था या संघटनेच्या माध्यमातून हाेत आहे. शेजारील कर्नाटक राज्यातील व सांगली जिल्ह्यातील गरजू लाेकं रुग्णालयात उपचारासाठी असतात, त्यांना जेवणाची व्यवस्था मदनी चॅरिटेबल ट्रस्ट व जमियत उलमा हिंद यांनी अन्नाची पाकिटे देऊन केली. मुफ्ती सादिक पटेल मदनी चॅरिटेबल चे हाफीज सद्दाम सय्यद,सुफियान पठाण, मुन्नाभाई पट्टेकरी, साेहेल सय्यद, अझरुद्दीन बेग, या सर्वांनी या उपक्रमाचे नियाेजन केले आहे.

img
मदनी ट्रस्ट तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रुग्णवाहिका आणि शववाहिका प्रदान करताना जिल्हाधिकारी अभिजीत चाैधरी उपस्थित हाेते.

मदनी ट्रस्ट तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रुग्णवाहिका आणि शववाहिका प्रदान करताना जिल्हाधिकारी अभिजीत चाैधरी उपस्थित हाेते.

img
दिव्यांग व अत्यंत गरजू अनाथ गाेरगरीब विधवा महिलांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जीवनावश्यक किटचे वाटप

संकटाच्या काळात दिव्यांग व गरजू तसेच विधवा महिला यांच्याकडे देखील या संस्थेने धाव घेतली आहे. अशाच काही दिव्यांग व विधवा महिलांना सांगली जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चाैधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जीवनाश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत चाैधरी यांनी जमियात उलमा-ए-हिंद व मदनी चॅरीटेबल ट्रस्ट यांच्यावतीने लाॅक डाउन काळात प्रशासनाला देखील मदतीचा हात देणारे व गाेरगरीब गरजू तसेच दिव्यांग सर्वसामान्य कुटुंबातील विधवा महिला या लाेकांना ही संस्था नेहमी मी त्यांचा विचार करत असल्याने या संस्थेचे जिल्हाधिकारी अभिजीत चाैधरी यांनी काैतुक केले. व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी जमियत उलमा-ए- हिंद चे जिल्हाध्यक्ष मुफ्ती सादिक पटेल, जमियत चे कार्याध्यक्ष व मदनी चारिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद मदनी चारिटेबल ट्रस्ट चे महासचिव सुफियान पठाण, हाफिज इलियास, ताेसिफ कडलास्कर, सलीम खिल्लेदार सर्व संस्थेचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित हाेते.


img